
नाशिक, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या मान्यतेने क्रीडा भारती, नाशिक आणि स्पोर्ट डान्स असोसिएशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय स्पोर्ट डान्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६ चे आयोजन गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक रोड येथे उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनीही या स्पर्धेत आपले कौशल्य सादर केले.

नृत्यकलेला क्रीडा क्षेत्राची जोड मिळावी, विद्यार्थ्यांना क्रीडा विभागाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळावे तसेच पात्र खेळाडूंना नियमानुसार क्रीडा गुणांचा लाभ मिळावा, या उद्देशाने स्पोर्ट डान्स असोसिएशनच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा भारती, नाशिकचे अध्यक्ष श्री. रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सौ. उत्तरा खानापुरे, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे माजी प्राचार्य श्री. वाकोलकर सर, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष श्री. विनोद शिरभाते, क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे क्रीडा केंद्रप्रमुख श्री. संजय पाटील, नाशिक स्पोर्ट डान्स असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. जतिंदर चीकी, सचिव सौ. मंजिरी पाटे, खजिनदार सौ. लीना शेख, पवन खोडे, मध्यमा भानुसे आणि आशिष पाटे उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा संयोजक श्री. अक्षय पाटे आणि श्री. योगेश शेरमाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्पर्धेला क्रीडा भारती, नाशिकच्या वतीने सौ. सुरेखा पाटील, श्री. सुनील दवंगे, श्री. अभिजीत देशमुख, श्री. रोहित भामरे, श्री. ऋषिकेश डावरे, श्री. प्रतीक मानकर, श्री. नचिकेत सैंदाणे, सौ. स्नेहल भामरे, सौ. स्वानंदी देशमानकर आणि सौ. कीर्ती शेवाळे यांनी शुभेच्छा दिल्या.

