
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- प्रेस मजदूर संघाचे आणि पळसे ग्रामविकास मंडळाचे माजी उपाध्यक्ष भास्करराव ढेरिंगे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव युवा उद्योजक अनिल ढेरिंगे यांनी पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाला चार पंखे प्रदान करत दातृत्वाचा वसा जपला.नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या सोहळ्यात पळसे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, संचालक विजय क्षीरसागर, पोलीस पाटील सुनील गायधनी यांच्या हस्ते हा उपक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करत विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.

