
नाशिकरोड 🙁 प्रतिनिधी )शारदीय नवरात्रोत्सव निमित्त आयोजक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय शासकीय रक्त पेढी व सहआयोजक वाघेश्वरी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.गेल्या २५ वर्षापासून वाघेश्वरी देवी मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. वृतांत वर्षी या रक्तदान शिबिराचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रक्तदान शिबिरा प्रसंगी प्रभाग १८ मधील नगरसेवक रंजनाताई बोराडे,सुनीताताई भोजने शिक्षण सभापती शरद मोरे, सागर भोजने, राहुल बोराडे, विशाल धोंगडे आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास वाघेश्वरी सहकारी गृह निर्माण संस्थेचे सहकार्य लाभत असते.

या रक्तदान शिबिरात महिलांचा विशेष सहभाग लाभला. रक्तदानाची सुरुवात महिला रक्तदात्यांपासूनच झाली. यावेळी सर्व महिलांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन विवेक विसपुते व सेक्रेटरी नारायण गाधेकर महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता काळे, कार्यवाहक विलास सोनार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रक्तदान शिबिरात 3५ रक्त पिशव्या संकलित झाल्या. शासकीय रक्तपेढीचे डॉ.पुरुषोत्तम पुरी, डॉ.प्रदीप माले,डॉ.मानसी पाटील व त्यांची टीम व परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.
फोटो : नाशिकरोड : वाघेश्वरी सोशल फाऊंडेशन व विभागीय संदर्भ रुग्णालय शासकीय रक्तपेढी यांचेवतीने आयोजित रक्तदान शिबिरा प्रसंगी रक्तदात्या महिला

