
नांदगाव (प्रतिनिधी ) दि.१६ जुलै २०२६ रोजी महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागामार्फत जागतिक सर्प दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी वन्यजीव सौरक्षणबहुउद्देशीय संस्था (VJSS) चे अध्यक्ष श्री. प्रभाकर निकुंभ तसेच त्यांचे सहकारी श्री. संदीप जाधव, श्री. गणेश पवार, श्री. मंगेश आहेर, श्री. मयूर हसवळ व श्री. ललित मोकळ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान श्री. प्रभाकर निकुंभ यांनी विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांमधील फरक, त्यांची वैशिष्ट्ये व गुणधर्म याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सापांबाबत समाजात पसरलेल्या विविध गैरसमजुतींचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान परिसरातून बचाव (रेस्क्यू) करून आणलेल्या सापांची वनपरिक्षेत कार्यालय नांदगाव येथ नोंदणी करून मुक्त (रिलीज) करण्याच्या (फॉरेस्ट हद्दीत) ठिकाणी..विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिकाद्वारे सापांची शरीररचना, रंगसंगती,सवयी, अधिवास तसेच ओळख करण्याच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांबाबत सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. प्रात्यक्षिकानंतर सापांना सुरक्षितपणे जवळील जंगल परिसरात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या कार्यक्रमास महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे, प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख श्री. एम. बी. अटोळे, डॉ. पी. एन. जाधव, श्री. ए. एम. लव्हाटे, सौ. पी. एस. कडलग तसेच शिपाई श्री. थोरात उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली.

