नाशिकरोड:- शिखरेवाडी येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात संस्थेचा अठरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला.
"संत साहित्यातील पुरुष व्यक्तिरेखा" हा इ.स.११३१ ते १९६८ या कालावधीतील संतसाहित्यातील काही थोर संतांचा जीवनक्रम संस्थेच्या पुरुष सभासदांनी अभिनयाने आणि त्यांच्या अभंगांनी उपस्थितांना करून दिला. उपाध्यक्षा सुनंदा गोसावी यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनातून तसेच मनीषा जोशी यांचे नृत्यदिग्दर्शन आणि अनिता जोशी यांचे सुमधुर आवाजातील अभंग सादरीकरण यामुळे कार्यक्रमाची उंचीवर गेला.
भिकप्पा नीळकंठ यांनी श्री बसवेश्वर महाराज, दत्तात्रय पाटील यांनी संत गोरा कुंभार, अनिल सहस्त्रबुद्धे यांनी संत नामदेव, अरुण देशपांडे यांनी संत चोखामेळा, गजानन वाघमारे यांनी श्री विठ्ठल, शिरीष लघाटे यांनी संत रामदास स्वामी, प्रल्हाद वकारे यांनी संत तुकाराम, अविनाश गोसावी यांनी संत गाडगेबाबा तर रवींद्र चंद्रात्रे यांनी संत तुकडोजी महाराज या आठ महान संतांचे जीवनकार्य मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांसमोर सादर केले.
अध्यक्ष जयराम कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या सन १९९६ पासूनच्या प्रगतीचा आलेख सांगितला आणि संस्थेच्या कार्यात, प्रगतीत संस्थेच्या महिला सभासदांचा मोठा वाटा असल्याचे अभिमानाने नमूद केले. उपाध्यक्ष सुनंदा गोसावी यांनी उपस्थितांना संस्थेतर्फे होणाऱ्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. सचिव अविनाश गोसावी यांनी संस्थेच्या नियोजित मांगीतुंगी आणि प्रकाशा येथील सहलीसंबंधीची सविस्तर माहिती करून दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनंदा गोसावी, मनीषा जोशी, अनिता जोशी, विभावरी जोशी मंगल मोहरील, वैजयंती चंद्रात्रे, शैलजा कुलकर्णी, सुधाकर सोनवणे, खजिनदार शरद वैद्य, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, उपसचिव श्रीकांत मोहरील, वसंत उपासनी, सिंधू उपासनी, मिलिंद ताथोडे, मंजुश्री ताथोडे, दिलीप भिंगारकर, दीपाली भिंगारकर, शैलजा कुलकर्णी यांनी विशेष श्रम घेतले. विभावरी जोशी यांनी सूत्रसंचालनाचा आदर्श परिपाठ उपस्थितांसमोर ठेवला. सुप्रिया बनसोड यांनी त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना तसेच निवेदन करत आभार मानले.