
मोठमोठ्या इंग्रजी शाळा नाहीत…महागडे कोचिंग नाही…
शहरातील आलिशान सुविधा नाहीत…
तरीही दौंड तालुक्यातील खडकी गावच्या श्रावणी कृष्णा कुदळे हिने जे करून दाखवले, ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे!
NEET परीक्षेत तब्बल 720 पैकी 710 गुण!
देशातील OBC मुलींच्या प्रवर्गात प्रथम क्रमांक..महाराष्ट्रात प्रथम क्रमांक..देशात AIR-5
ही कामगिरी केवळ एका विद्यार्थिनीची नाही, तर जिल्हा परिषद शाळांवर, ग्रामीण शिक्षणावर आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब करणारी आहे.
श्रावणीने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले. दहावीपर्यंत सेमी-इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत, जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर तिने देशातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
या यशामागे तिचे आई-वडील, ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त शिक्षक श्री. कृष्णा कुदळे सर आणि सौ. जयश्री कुदळे यांचे संस्कार, मार्गदर्शन आणि अथक परिश्रमही तितकेच मोलाचे आहेत.
ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी—
यशासाठी इंग्रजी माध्यम नाही, तर मोठी स्वप्ने, कठोर परिश्रम आणि स्वतःवरचा विश्वास आवश्यक असतो!
आज खडकी गावाचा, दौंड तालुक्याचा आणि महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक अभिमानाने म्हणत आहे…
“ही आमच्या मातीतली लेक आहे!”
श्रावणी कृष्णा कुदळे आणि कुदळे परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा

