
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन —
घोटी या मुख्य बाजारपेठ व मध्यवर्ती ठिकाण असणार्या शहरात रोज शेकडोनीं नागरिकाचीं ये जा असते.मात्र येथील बस स्थानकास दरवर्षी प्रमाणेच यंदाही चक्क तळयाचे स्वरुप आले असुन बस स्थानकातच खड्डयाचें साम्राज्य पसरले आहे.विशेष म्हंणजे दरवर्षीची ही भयंकर पावसाळी दुरावस्था संपवण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांचे विकासनिधीतुन लाखो रुपयाचा खर्च करण्यात आला आहे.

मात्र अत्यंत सुमार दर्जाचे काम करत ठेकेदाराने स्वत;चे उखळ पांढरे केले आहे खरे पण बस स्थानकाचीं दुरावस्था मात्र जैसे थे च राहिली आहे. घोटी ही तीन जिल्हयातील सीमेलगतचे तालुके व इगतपुरी तालुक्याची मोठी बाजारपेठ आहे. येथील पोहा, तांदुळ व मुरमुरा महाराष्ट्र भर प्रसिद्द आहे.त्या मुळे या शहरात सातत्याने नर्दळ असते.येथील बस स्थानक प्रवाशानीं सतत गजबजलेले असुन शेकडो प्रवासी येथुन ये जा करतात.व यातुन आगारास ही लाखो रुपयाचे भरघोस उत्पन्न मिळते. मात्र असे असुनही येथील बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था आहे. संपुर्ण बस स्थानक परिसरात खड्डे पडलेले असुन पावसाळयात या बस स्थानकाला चक्क तळयाचे रुप येते आहे.

या ठिकाणी बसेस फिरवण्यासाठी चालकानां व येण्या जाण्यासाठी प्रवाशानां कसरत करावी लागते आहे. विशेष म्हंणजे बस स्थानक खड्डे मुक्त करणेचे नावाखाली आमदाराचें विकासनिधीतुन लक्षावधी रुपयाचा खर्च झालेला आहे. मात्र यानंतरही हे बस स्थानक खड्डेंयच बनले असुन सुमार दर्जाचे काम पहिल्याच पावसात उखडुन गेले आहे. या शिवाय स्वच्छतेच्या नावाने चांगभल असुन नव्याने बांधल्यानंतर ही देखभाल व स्वच्छते अभावी प्रसाधनगृहाची दुरावस्था मात्र कायम आहे. या कामाची चौकशी करावी. ठेकेदारावर कारवाई करावी आदी मागण्या प्रवासी करत आहे.

