
नांदगाव-(प्रतिनिधी)
आषाढी एकादशी निमित्त आश्रमशाळा सारताळे येथे संस्था सरचिटणीस मा. रमेश अप्पासाहेब पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्था कोषाध्यक्षा तथा प्राथमिक आश्रमशाळा मुख्याध्यापिका नम्रता पगार मॅडम व प्राचार्य श्री समाधान चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिंडी सोहळा व विठ्ठल रुख्मिणी पाद्य पुजन संपन्न झाले. टाळ, मृदंग, वीणा व हरी विठ्ठल नमःघोषानं असमंत दुमदुमले वरून राजानही हजेरी लावीत श्रीमंत विठ्ठल रुखमाई जलाभिषेक केला.कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर, अधीक्षक व अधिक्षिका यांनीही विशेष प्रयत्न केलेत. कार्यक्रमास सर्व कर्मचारी, अधीक्षक, अधिक्षिका उपस्थित होते.


