
नांदेड ( प्रतिनिधी ) २६ जुलै २०२६ रोजी दीपस्तंभ प्रतिष्ठान नांदेड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आंबेडकरवादी मिशन सिडको येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात कु. शताक्षी शंकर गच्चे या विद्यार्थिनीने दहावी बोर्ड परीक्षेत ९५% गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल तिच्या पालकांसह सन्मान चिन्ह, भारतीय संविधान व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कदम आंबेडकरवादी मिशनचे ते सर्वे सर्वा आहेत त्यांनी नांदेड येथून आज पर्यंत १८१ पेक्षा जास्त आय.ए.एस आय.आर.एस, आय.एफ.एस, आय.पी.एस, उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार असे असंख्य सनदी अधिकारी आंबेडकरवादी मिशन मधून तयार केले आहेत. ते देशातील विद्यार्थ्यांचे आयकॉन आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नंदन नागरे माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे,मा. संजय खंडारे अधिक्षक अभियंता महावितरण नांदेड, मा.प्रीती कदम एम.डी. मेडिसिन कॅन्सर तज्ञ सनशाईन कॅन्सर हॉस्पिटल नांदेड, विशेष सत्कार मूर्ती संदीप नागोराव वाघमारे मुधोळकर आय.ई. एस. बेंगलोर, निमंत्रक हौसाजी वारघडे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेड दक्षिण, स्वागत अध्यक्ष एडवोकेट विजय गोणारकर ज्येष्ठविधीतज्ज्ञ जिल्हा सत्र न्यायालय नांदेड, दीपस्तंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ कार्लेकर, रंजीत गोणारकर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. शताक्षी ही यापूर्वी पाचवी व आठवी स्कॉलरशिप धारक आहे. इयत्ता आठवी ओलंपियाड आय.ई.ओ. मध्ये तिने ६०पैकी ५६ गुण घेऊन इंटरनॅशनल रँक मध्ये तिचा २४ वा क्रमांक होता. ती चित्रकला परीक्षेतही विशेष प्राविण्यासह एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा ए ग्रेडने पास झालेली आहे. तिच्या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक तसेच समाजातील सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

