
नाशिक-(प्रतिनिधी ) जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख तसेच पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समिती व बळीराजा हक्क समितीच्या राज्य समन्वयकपदी ज्येष्ठ पत्रकार विनायक इनामदार यांची जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव यांनी नुकतीच निवड केली आहे.

याआधी पत्रकार संघात विनायक इनामदार हे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि पत्रकार संघातील संघटनात्मक कार्य व नेतृत्वाच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव तसेच राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांच्यावर राज्य संपर्क प्रमुख तसेच पोलीस मित्र समिती व बळीराजा हक्क समितीच्या राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर जबाबदारी सोपवल्यामुळे राज्यातील पत्रकारांच्या व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पत्रकार संघ अधिक सक्षम व प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विनायक इनामदार यांनी अनेक दैनिकांमध्ये पत्रकारिता करून प्रभावीपणे आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
विनायक इनामदार यांनी रस्ते, सुरक्षा , पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्राहक हित व ग्राहक हक्क तसेच शेतकऱ्यांचे व कामगारांचे प्रश्न यांसारख्या लोकहिताच्या विषयांवर त्यांनी सातत्याने पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. त्यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच पत्रकरिता क्षेत्रातील मान्यवरांकडुन त्यांचे कौतुक केले जात आहे.

