
पुणे (प्रतिनिधी) – मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीचा जागर पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ मराठीचा ध्यास घेऊन साहित्य रसिकांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने ९९ वे नांदी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे.
या संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले की, हे संमेलन केवळ साहित्यिकांचा मेळावा नसून मराठी भाषा, संशोधन, नवसर्जन, युवा पिढी आणि समाज यांना जोडणारा व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल.
९९ वे नांदी साहित्य संमेलन १४ ऑगस्ट रोजी पुण्यातील हिराबागच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनात ज्यांची शंभर वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस आणि व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

संमेलनाच्या नियोजनासाठी संलग्न शाखा पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महांकाळ, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, कार्यवाह प्रसाद मिरासदार, आशुतोष जावडेकर, सुनील महाजन, माधव राजगुरू, अंजली कुलकर्णी, सुनेत्रा मंकणी, विभागीय कार्यवाह जयंत येळुलकर, संजीव गिरासे, नाशिक प्रतिनिधी प्रकाश होळकर,उन्मेश गायधनी,आदी उपस्थित होते.
डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले की, शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भारतासह परदेशातील मराठी साहित्य रसिकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहभागी करून घेण्यात येणार आहे. विद्यापीठाची मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी असलेली भूमिका अधिक व्यापक करण्याचा हा प्रयत्न आहे.
मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी हे संमेलन महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, साहित्यिक, विद्यार्थी आणि रसिकांसाठी हा एक मोठा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.


महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोनम यांच्या हस्ते प्रा.सुरेश नारायणे लिखित काव्यसंग्रह “शब्दांचं जगणं” याचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी सौ.अलका नारायणे, प्रा. सुरेश नारायणे, महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्ष योगेशजी सोनम व नांदगाव मसाप शाखा उपाध्यक्ष किरण मोरे

