
वासोळ इंदिरा माध्यमिक विद्यालयात डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करतांना…
वासोळ:( प्रतिनिधी)- येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.केदार एस.एस.मुख्याध्यापक हे होते.सुरवातीला विद्यार्थ्यांची भाषणे झाली व श्री.सावंत व्ही.बी.सर यांनी विद्यार्थ्यांना डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विषयी माहीती सांगितली.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण झाले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.चौधरी सर यांनी केले.


