
पिंपरखेड ( प्रतिनिधी )सोमवार दि. २७/७/२०२६ रोजी विद्यालयात सकाळी ठीक १० वा. शिक्षक पालक सभा बहुसंख्य पालकांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी हे होते तर सभेस मा. लक्ष्मण मेंगाळ, भास्कर नाना मवाळ, रामदास सुपडू चव्हाण, हिरामण मेंगाळ
यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
सुरूवातीस अध्यक्ष व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सरस्वती पूजन करून सभेस सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मा. संजय कांदळकर यांनी केले.
विद्यार्थी उपस्थिती, विद्यार्थी सुरक्षा, विद्यार्थी गुणवत्ता, शालेय शिस्त, विविध स्पर्धा परीक्षा, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली क्षेत्र भेट, वादविवाद स्पर्धा व विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग व त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून विद्यालयाच्या वतीने केलेले प्रयत्न आदी विषयांशी मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी यांनी उपस्थितांना अवगत केले. भाऊसाहेब सोनवणे, पंडित राऊत, ज्ञानेश्वर तांदळे, अनिल बोरसे, दिपक आहेर, अनिल ठाकरे, उमेश देशमुख आदी पालकांनी आपापले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी सुरक्षा व गुणवत्तापूर्ण शिक्षण, ई. मुद्यावंर सर्वांचे एकमत झाले. त्यासाठी सर्व उपस्थित पालकांनी विद्यालयास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सभेस मा. उत्तम सोनवणे, मा. संदीपभाऊ मवाळ, मा. लक्ष्मण जाधव, श्रीमती अमिता पारखे, पुनम घाडगे, मा. आबासाहेब सोनवणे, निलेश चव्हाण आदी शिक्षक वृंद व असंख्य पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. संजय कांदळकर यांनी तर आभार मा. कैलास पठाडे यांनी मानले.

