
बोयगाव( प्रतिनिधी )नाशिक जिल्हा संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ बोयगाव संचालित जनता विद्यालयात 15 ऑगस्ट ध्वजारोहण सोहळा संपन्न बोयगाव येथील जनता विद्यालयाच्या पटांगणात आज 15 ऑगस्ट 2026 80 वा. ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, पालक वर्ग, व विद्यार्थी गण उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सर्व पदसिद्ध पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ यांच्या स्वागताने झाली. ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.महेंद्र (दादा) साहेबराव नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी इ.दहावीतील विद्यार्थिनी समूहाने राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत गायन करून झेंड्यास मानवंदना दिली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अमोल काटवानी सर यांनी केले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर भाषणे व समूहगीत गायन करण्यात आले. विद्यालयातील सांस्कृतिक स्पर्धे अंतर्गत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक श्री हिरे सर तर आभार श्री विसपुते सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक श्री.महेश सरोदे सर, श्री.दुकळे सर, श्रीम.नरोटे मॅडम, श्री.योगेश नरोटे, श्री.वाल्मीकअण्णा आहेर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

