
ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढकांबे येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करणे हा सर्जनशील व आनंददायी उपक्रम उत्साहात घेण्यात आला.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या आकर्षक साहित्याचा वापर करून सुंदर व कल्पक राख्या तयार केल्या.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती, कलाकौशल्य, सहकार्याची भावना आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.या उपक्रमासाठी श्री. अनिल भरीतकर साहेब, केंद्र समन्वयक, तळेगाव-दिंडोरी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी उपक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह यामुळे आनंददायी शनिवार उपक्रमाचे खरे उद्दिष्ट साध्य झाल्याचे दिसून आले.


