
नांदगाव ( प्रतिनिधी ). कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथील १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात मनमाड महाविद्यालयाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला.
या शानदार विजयासह संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सामनावीर – राम हिरे
इयत्ता ११वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी राम हिरे याने अष्टपैलू कामगिरी करत नाबाद ५५ धावा केल्या तसेच गोलंदाजीत महत्त्वाचे २ फलंदाज बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या उल्लेखनीय यशाबद्दल म. वि. प्र. समाज, नांदगावचे संचालक इंजी. मा. श्री. अमित भाऊ बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील, कला-वाणिज्य विभाग प्रमुख श्री. जी. व्ही.बोरसे, विज्ञान विभाग प्रमुख श्री. पी. एन. जपे, NSS Officer श्री. बी. के. पवार, उपप्राचार्य व फिजिकल डायरेक्टर श्री. डी. एम. राठोड तसेच बायलॉजीचे ज्येष्ठ शिक्षक श्री. मोहन कडाळी यांनी विजयी संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले.
विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला हार्दिक शुभेच्छा!
“यशाची हीच भरारी… जिल्हास्तरावरही विजयाची तयारी!”

