
नाशिक (प्रतिनिधी) मराठी भाषा ही आपली आई आहे. आपण घरामध्ये ज्याप्रमाणे आई, वडील, भाऊ, बहीण यांच्या विषयी एक आपुलकीची आणि आदराची भावना ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये मराठी भाषेविषयी भावना असली पाहिजे असे उदगार मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांनी काढले ते नाशिक येथील कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्यावतीने मलकापूर येथे स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये झालेल्या मराठी उपासक पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, कुसुमाग्रज यांनी ज्याप्रमाणे मराठी भाषेसाठी कार्य केले तसेच कार्य सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासूनच मराठी विषयी आपुलकी ठेवून केले पाहिजे. मराठी भाषेच्या संवर्धनाचे अन मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी नाशिक येथील कुसुमाग्रज मराठी विचार म्हणजे जे काम करत आहे ते काम अतिशय स्पृहणीय आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाची विदर्भातील सुरुवात करण्याचा भाग्य मलकापूरला मिळालं ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यावेळी स्कूलचे अध्यक्ष उल्हास संचेती, सेक्रेटरी ॲड. अमर संचेती, कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस सुभाष सबनीस हे उपस्थित होते या सीबीएससी पॅटर्नच्या इंग्लिश मीडियम स्कूल मधील चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना “असे होते कुसुमाग्रज” ही पुस्तिका वाचायला देऊन त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहून घेण्याची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ‘मराठीचे उपासक’ ही पदवी देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम आज रोजी मलकापूर येथील स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये संपन्न झाला यावेळी या परीक्षेमध्ये सहभागी विद्यार्थी परीक्षेसाठी मदत करणारे सर्वात सूक्ष्म रुंद मुख्याध्यापक यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक सर्व विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिन्सिपल सुदीप्ता सरकार यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक श्री विजय तायडे यांनी केले.

