
नांदगाव ( प्रतिनिधी ): मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेच्या वतीने संस्थेच्या विविध शाखांमध्ये प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त सेवकांच्या गौरवार्थ सेवानिवृत्त सेवक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या प्रगतीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवकवर्गाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या निष्ठावान सेवेमुळे संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी, नांदगाव (न्यू इंग्लिश स्कूल कॅम्पस) येथे संपन्न होणार आहे.
या ऋणानुबंधाच्या सोहळ्यास संबंधित सर्व सेवानिवृत्त सेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून इंजि.अमित उमेदसिंग बोरसे-पाटील, संचालक, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.

