
नांदगाव 🙁 प्रतिनिधी ) जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. कनिष्ठ महाविद्यालयातील साक्षी प्रमोद सोनवणे आणि कावेरी आबासाहेब काळे या विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर हे यश संपादन केले. या यशाबद्दल म.वि.प्र. संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील, श्री. अशोकराव कुंदे साहेब, कला व वाणिज्य विभागप्रमुख श्री. जी. व्ही. बोरसे, विज्ञान विभागप्रमुख श्री. जपे पाटील, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व क्रिडा संचालक प्रा.डी.एम.राठोड तसेच महाविद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी दोन्ही विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थिनींना उपप्राचार्य श्री. डी.एम.राठोड, क्रीडा संचालक प्रा. लोकेश गळदगे आणि क्रीडा विभाग सहाय्यक दिलीप अहिरराव यांनी कौशल्यविकास व तांत्रिक मार्गदर्शन केले. क्रिडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना स्पर्धेची प्रभावी तयारी करता आली. महाविद्यालयाच्या दोन्ही विद्यार्थिनींच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, विभागीय स्तरावरही त्या उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास महाविद्यालय परिवाराने व्यक्त केला.

