
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३७१ वा दिवस

चित्ताला किंवा मनाला वृत्तींच्या रूपांनी फुटू न देता थोपवून धरण्याचे शास्त्र म्हणजेच योग होय. *'योगश्चित्तवृत्तिनिरोधः।'* मन हे विषयांचे ठसे आणि त्यांची अनुभूती यांचे, म्हणजेच क्रिया आणि प्रतिक्रिया यांचे मिश्रण आहे, आणि म्हणून ते नित्य स्वरूपाचे असणे शक्य नाही. ह्या मनाला एक सूक्ष्म शरीर असते, आणि त्या सूक्ष्म शरीराद्वारे मन हे स्थूल शरीरावर कार्य करीत असते, वेदान्त म्हणतो की, ह्या मनाच्या पाठीमागे खरा आत्मा विद्यमान आहे. वेदान्त ह्या इतर दोहोंचा, म्हणजेच शरीराचा आणि मनाचा स्वीकार करतो, परंतु त्याचबरोबर तो आणखी एक तिसरी अशी सत्ता मानतो की जी नित्य आहे, अनंत आहे, अंतिम तत्त्वाच्या स्वरूपाची आहे, विश्लेषणान्चे अखेरचे फल आहे, अखंड एकरस आहे, आणि जिचे आणखी भाग वा विघटन करता येणे शक्य नाही म्हणजेच ती मिश्र स्वरूपाची नाही जन्म म्हणजे पुनर्घटन आणि मृत्यू म्हणजे विघटन.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्रपद १ शके १९४८
★ श्रावण शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६
★ पुत्रदा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ आदित्य पूजन
★ शरद ऋतू प्रारंभ
★ १९१८ प्रसिध्द मराठी लेखक, कवी, लघुनिबंधकार, टिकाकार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवीवर्य गोविंद विनायक तथा विं. दा. करंदीकर यांचा जन्मदिन.
★ १९७४ मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा स्मृतीदिन
★ आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन.

