
नांदगाव ( प्रतिनिधी ) कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे तसेच सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील लक्ष्मी नगर येथे ओपन स्पेस वरती अतिशय सुंदर असे श्री महालक्ष्मीचे मंदिर बांधण्यात आले आहे, या ठिकाणी त्यांनी स्वखर्चातून दिलेली श्री महालक्ष्मीची मूर्ती ची अतिशय मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे उपस्थित होते.
नांदगाव शहरांमधील मालेगाव रोड येथील लक्ष्मी नगर भागामध्ये खूप ओपनस्पेसला वॉलकंपाऊंड करून सुशोभीकरण करण्यात आले

त्यामध्ये ग्रीन जिम, सभामंडप, पेवर ब्लॉक, गार्डन, हायमास्क, व एक सुंदर असे श्री महालक्ष्मी माता मंदिर बांधले असून सदर मंदिराची प्राणप्रतिष्ठा 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री महालक्ष्मी माता मूर्ती मिरवणुकेने करण्यात आली, याआधी तीन दिवस महापूजेचे आयोजन करण्यात आले होते

या तीन दिवसासाठी मुख्य यजमान म्हणून तीन जोडपे पूजेसाठी बसण्यात आले होते श्री व सौ ज्ञानेश्वर भाऊ वाघ श्री व सौ पी आर पाटील सर श्री व सौ सोमनाथ भाऊ दुसाने हे मुख्य यजमान होते यांच्या हस्ते तीन दिवसांमध्ये अग्नि मंथन, नवग्रह रुद्र स्थापन, नवग्रह हवन, जलाधिवास, प्रधान हवन, तत्त्वज्ञास हवन, धाण्याधिवास,उत्तरांग हवन, बलिदान, कलश स्थापन, ध्वजारोहण, पूर्णाहुती, नैवेद्य, आरती, महाप्रसाद, लोकांचा भंडारा इत्यादी अशाप्रकारे विविध विधी प्रसाद कुलकर्णी व त्यांच्या अन्य पाच पुरोहितांसह कार्यक्रम संपन्न झाले.

या प्रसंगी कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांचे वारकरी विद्यार्थी यांनी टाळ मृदुंग व अभंगाच्या स्वरांमध्ये प्रवेशावेळी स्वागत करून अण्णांच्या हस्ते ध्वजाहरण ,मूर्ती स्थापना व पूर्णाहुती देऊन यज्ञ पूर्ण करण्यात आले व सायंकाळी समृद्धी बँकेच्या चेअरमन सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

सदर कार्यक्रमासाठी प्रभागातील उपनगराध्यक्ष वाल्मीक टिळेकर तसेच नगरसेविका कल्पनाताई जगताप व समाजसेवक वाल्मीक जगताप सर यांनी विशेष परिश्रम घेतले त्याच बरोबर श्री व सौ विठ्ठलराव गरुड, ज्ञानेश्वर वाघ रवींद्र बोराडे पी आर पाटील सोमनाथ दुसाने डॉक्टर नरेंद्र सूर्यवंशी अशोकराव भागवत प्रमोद सुरेश भाऊ पवार चव्हाण सर सागर गोवेकर गुलाब पाटील सर राजू गुप्ता अनिल गुप्ता यांनी विशेष सहकार्य केले.

या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रोहिणीताई मोरे, गटनेता स्वातीताई नावंदर, नगरसेविका रूपालीताई पाटील योगिताताई खरोटे,भारतीताई बोरसे, आनंदभाऊ कासलीवाल, नूतनभाऊ कासलीवाल, श्यामभाऊ दुसाने, काशिनाथ देशमुख, नंदूभाऊ पाटील, नाना जाधव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव साहेब तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका, कॉलनीतील रहिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

