
नाशिक ( प्रतिनिधी )दैनिक लोकमत व वेदनहर्ता आयोडेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श अधिकारी पुरस्कार शेखर बागडे यांना. दैनिक लोकमत व वेदनहर्ता आयोडेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवी, मुंबई, मुंबई, ठाणे, पनवेल येथील महापालिका अधिकारी, प्राध्यापक, समाजातील कल्याणकारी व्यक्ती व संस्था यांना आज ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल I.A.S.यांच्या शुभहस्ते ठाणे येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यामध्ये भगूर चे सुपुत्र व स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे आधारस्तंभ शेखर बागडे यांना जर्मन बेकरी तपास, लहान मुलाचे अपहरण तपास, आदी उत्कृष्ट तपासाबद्दल उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे वृत्तपत्र व त्यामध्ये आघाडीवर असणारे लोकमत वृत्तपत्र व आयोडेक्स यांच्या वतीने मिळालेल्या या पुरस्काराबद्दल भगूर पुत्र, पोलिस उपायुक्त शेखर बागडे यांचा समितीस अभिमान आहे, गोरगरिबांना मदत करणारे व सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सामील होणारे, कुठलाही बडेजाव न करणारे बागडे साहेब हे भगूर चे भूषण आहे, स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समिती भगूर च्या वतीने मनपूर्वक अभिनंदन, व भावी वाटचालीस शुभेच्छा.

