
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४०७ वा दिवस
'तपस्' शब्दाचा भात्वर्थ आहे तापविणे वा गरम करणे. 'तप' ही आपल्या उच्च प्रकृतीला 'तप्त' वा उत्तेजित करण्याची विशिष्ट साधना वा एक विशिष्ट प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ; सूर्योदयापासून तो सूर्यास्तापर्यंत दिवसभर मधे मुळीच खंड न पडू देता सतत एकसारखा ॐकाराचा जप करण्याचे व्रत घेणे हा तपाचा एक प्रकार आहे. ह्या साऱ्या क्रियांनी एक शक्ती जन्मत असते; त्या शक्तीला तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार आध्यात्मिक वा भौतिक कोणत्याही रूपात रूपान्तरित करू शकता. ही तपाचरणाची वा तपश्चर्येची भावना समस्त हिंदुधर्मात अगदी ओतप्रोतपणे भरून आहे. ईश्वरालाही हे जग सृजन करण्यापूर्वी तप करावे लागले होते. ते एक विशिष्ट मानसिक साधन आहे त्याने काय वाटेल ते साधता येणे शक्य आहे. शास्त्रात म्हटले आहे 'तपाने अलभ्य असे ह्या त्रिभुवनातही काहीच नाही.'
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास ६ शके १९४८
★ भाद्रपद वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. २८ सप्टेंबर २०२६
★ पितृपक्ष- द्वितीया श्राध्द
★ १८९८ स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्मदिन
★ १९२९ सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त गायिका, भारताची गाण कोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्मदिन.
★ १९६७ थोर क्रांतिकारक व समाज सुधारक पांडूरंग महादेव तथा सेनापती बापट यांचा स्मृतीदिन
★ जागतिक रेबीज दिन.

