
पुणे (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात राहणारे कवी भूषण विठ्ठल दळवी सर हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती जपण्याचे पवित्र काम करत आहेत आपला राष्ट्रीय ग्रंथ श्रीमद भगवद्गीता गाथा मुळशी तालुक्यातील भालगुडी येथील एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले युवा उद्योजक सन्माननीय महेंद्र भाऊ साठे यांचा वाढदिवस हिंदू परंपरेनुसार औक्षण करून व राम कृष्ण हरी माऊली माऊली म्हणत श्रीमद् भागवत गीता या गाथेचे वाचन करून ही गाथा त्यांना वाढदिवसानिमित्त भेट देऊन हा वाढदिवस मोठा उत्साहात सादर करण्यात आला.
आपली भारतीय संस्कृती ही जगामध्ये महान संस्कृती असल्याने ती टिकली पाहिजे. समजली पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम श्री विठ्ठल दळवी सर हे राबवत असतात. या आपल्या राष्ट्रीय ग्रंथाची जाणीव ही प्रत्येकाला झाली पाहिजे. प्रत्येकाने त्याची वाचन मनन केले पाहिजे. तसेच मुलांना समाजाला समजावा असा पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वरी गीता गाथा घराघरात जावा व असे ग्रंथ अभ्यासक्रमात यावेत त्याप्रमाणे सर्वांनी वागाव. संत विचारातून महाराष्ट्र घडावा अशा पवित्र हेतूने हा नवीन उपक्रम कवी भूषण विठ्ठल दळवी सर वाढदिवसानिमित्त साजरे करीत असतात. थोर संतांचे संस्कृतीचे रक्षण झाले पाहिजे. अशा पवित्र उद्देशाने भारत गौरव पुरस्कार प्राप्त मावळचे कवीभूषण विठ्ठल दळवी सर हे एक समाजाला नवीन संदेश देतात. गोमातेचे रक्षण करूया, पवित्र हिंदू धर्माचे पावित्र्य जपुया, आणि त्याप्रमाणे वागूया, त्याचप्रमाणे प्रदूषण रूपी पर्यावरणाचे संवर्धन करूया, यासाठी सिमेंटचे जंगले कमी करून त्या ठिकाणी वर्ड पिंपळ चिंच यांसारखे ऑक्सिजन पूरक झाडे लावूया. अशाप्रकारे वाढदिवसानिमित्त एक रोपटे आणि श्रीमद भगवत गीता ग्रंथाची एक प्रत देऊन त्यांनी हा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्याशिवाय आपण संस्कृत जगात महान वैभवशाली परंपरा व इतिहास वाचल्याशिवाय अभ्यासल्याशिवाय इतिहास घडणार नाही. असा संदेश त्यांनी या उपक्रमातून तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहे..

