
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४१९ वा दिवस

आपल्या अनुभवास येणारे हे जग सत्य आणि मिथ्या यांच्या मिश्रणातून उत्पन्न झाले आहे. एखाद्या समांतरभुज चौकोनाच्या दोन संलग्न भुजांवरील शक्ती जर एखाद्या वस्तूवर कार्य करतील तर ज्याप्रमाणे त्या वस्तूला त्या चौकोनाच्या कर्णाच्या रोखाने गती येत असते, त्याचप्रमाणे हा संसार वा हे जीवनही आमच्यावर कार्य करणाऱ्या निरनिराळ्या विरोधी शक्तींचे फल होय. हे जग ब्रह्मस्वरूप आणि सत्य आहे, परंतु आपण जगाला त्या दृष्टीने बघत नाही. जी सत्ता एखाद्या सत्य वस्तूच्या अस्तित्वावर अवलंबून असते तिलाच अध्यस्त सत्ता म्हणतात. जसे, पूर्वी आपण एखादे दृश्य बघितले होते, त्याचेच आता आपल्याला स्मरण झाले. तेवढ्या वेळेपुरते ते आपल्याला सत्य आहे असे वाटते खरे, पण वस्तुतः ते सत्य नसते. उष्णता हा काही पाण्याचा धर्म नाही, तरीही आपण पाणी गरम आहे अशी कल्पना करीत असतो, तसेच ह्या अध्यासाचे आहे. सारांश, अध्यास म्हणजे *'अतस्मिन् तद्बुद्धिः'* जी वस्तू जशी नाही, तशी तिला समजणे. यावरून हे स्पष्ट होते की, आपण जेव्हा जगत बघतो, तेव्हा आपण सत्य वा ब्रह्मच बघत असतो, परंतु ते सत्य आणि आपण यांच्यामध्ये मायेचा पडदा आला आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास १८ शके १९४८
★ भाद्रपद अमावस्या
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. १० ऑक्टोबर २०२६
★ सर्वपित्री अमावस्या
★ १८९९ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, कामगार नेते काॅम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्मदिन.
★ १९०६ इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक ‘मालगुडी डेज’ चे लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्मदिन
★ १९१० हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक असलेले डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्मदिन
★ १९५४ प्र. के अत्रे यांच्या श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
★ जागतिक मानसिक आरोग्य दिन.
★ राष्ट्रीय जंतनाशक दिन.

