
मुखेड: सामाजिक फाउंडेशन चे उद्घाटन करताना श्री श्री १००८महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज उपस्थित पंकज जाधव, बाळासाहेब पाटील, भास्करराव जाधव आदी
नाशिक: दि.17 (वार्ताहर)
पिता धर्म: पिता स्वर्ग: पिता ही परम तप:….
अर्थात पिता हाच धर्म, पिता हाच स्वर्ग आणि जन्मजात पित्याची सेवा हीच मोठी तपश्चर्या…
निफाड तालुक्यातील शेती, सहकार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मुखेड गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक तथा जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून समाजकार्य करणारे स्व. अशोकराव (आण्णा) जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री पंकज दादा जाधव यांनी आपल्या वडिलांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे नेण्याकरता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून “स्व.अशोक (आण्णा) भाऊराव जाधव फाउंडेशन ची सुप्त व महत्त्वाकांक्षी संकल्पना मांडली व समस्त गावकऱ्यांनी या लोकाभिमुख संकल्पनेचे मनस्वी स्वागत केले. याप्रसंगी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज ( पंच दशनाम आखाडा ) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले..!
स्वर्गीय अशोक (आण्णा ) भाऊराव जाधव फाउंडेशनचे संस्थापक श्री पंकज दादा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमच्या वडिलांनी जोडलेली माणसे आणि त्यांनी दिलेली समाजसेवेची शिकवण हेच आमच्या जाधव कुटुंबीयांची खरी संपत्ती होय. त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा चालवण ही आमच्या कुटुंबीयांची नैतिक जबाबदारी आहे म्हणून ती पूर्ण करण्यासाठी आज आम्ही या फाउंडेशनची स्थापना केली आहे या माध्यमातून नक्कीच शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मजूर अशा समाजातील सर्व घटकांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल मग यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य साहित्य, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, बेड,स्टिक ई. देण्यात येणार आहे तथापि परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज दादा जाधव यांनी केले…!
त्यांच्या या कार्यात श्री श्रीकांत आहेर,श्री विष्णू आहेर, जाधव कुटुंबीय समस्त गावकरी मुखेड नातेवाईक व आप्तेष्ट यांची मोलाची साथ लाभली.!

