
गांगलगाव /बबनराव आराख)
साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेत,दै.न्यायहक्क समताशाही तसेच लोकसेवा शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्था तथा साप्ताहिक जाणेफळ एक्सप्रेस ‘ मोरोती पेठ, जिल्हा बुलढाणा यांच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा, यंदाचा ‘ राज्यस्तरीय न्यायहक्क समताशाही साहित्यभूषण पुरस्कार 2027 जाहीर झाला आहे.
कवी,लेखक साहित्यिक बबनराव आराख यांना नुकतेच पुरस्कार निवड समीती तर्फे सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
बबनराव आराख ‘वाचन छंद प्रेमी साहित्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष असून, राष्ट्रीयस्थरावर कार्य करणारे प्रसिद्ध उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर याचे राज्य प्रसिद्धीप्रमुख पदावर कार्यरत आहे.

बबनराव आराख यांचे साहित्यिक क्षेत्रातील मोलाचे योगदान पाहता, हा बहुमूल्य समजला जाणारा ‘ राज्यस्तरीय न्यायहक्क समताशाही साहित्यभूषण पुरस्कार 2027 जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कार दैनिक न्यायहक्क समताशाही व साप्ताहिक जाणेफळ एक्सप्रेस व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेहकर येथे संपन्न होत असलेल्या कार्यक्रमात सदर पुरस्कार देण्याचे पत्रात म्हटले आहे.
राजस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, बबनराव आराख यांचे साहित्यक्षेत्र सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे.

