
भालूर (वार्ताहर) मासिक पाळी ही एक नैसर्गिक जैविक घटना आहे जी जगभरातील लाखो महिला अनुभवतात. परंतु ही एक सामान्य गोष्ट आहे, मासिक पाळी ही मिथक, गैरसमज आणि निषिद्ध गोष्टींनी वेढलेली आहे.मासिक पाळीच्या काळात स्वच्छता व्यवस्थापन हे आरोग्यासाठी आणि महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे आहे. परंतु अशा प्रकारच्या प्रतिबंधांना तोडले पाहिजे आणि असे करताना, असे वातावरण निर्माण केले पाहिजे ज्यामध्ये महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात आरोग्य आणि स्वच्छता प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास आत्मविश्वास असेल आणि त्यांना पाठिंबा दिला जाईल जेव्हा मासिक पाळी गुप्ततेत लपवली जाते, तेव्हा महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या आरोग्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि संसाधने शोधण्यापासून रोखले जाते.यामुळे महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या स्वच्छतेमध्ये अडथळे येऊ शकतात, स्वच्छता आणि सुविधांची कमतरता येऊ शकते, तसेच मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल चुकीची माहिती मिळू शकते. परिणामी, महिलांना संसर्ग, अस्वस्थता आणि शिक्षण आणि रोजगाराच्या संधी गमावण्याचा अनुभव येऊ शकतो.त्यामुळे महिलांनी शारीरिक आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहिले पाहिजे असे प्रतिपादन मनमाड उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ.वृषाली जोशी यांनी केले.
भालूर येथील जनता माध्यमिक विद्यालयात आयोजित मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेत त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य जी. ए. वैद्य, भालूर येथील आरोग्य उपकेंद्राच्या श्रीमती गुंजाळ उपस्थित होत्या.
श्रीमती गुंजाळ यांनी विद्यार्थिनींना वयात येतांना मुलींमध्ये कोणकोणते बदल होतात,गुड टच, bad टच , स्वच्छता या विषयी माहिती दिली. त्याचबरोबर विद्यालयातील शिक्षिका श्रीम. पवार मॅडम यांनी आहार व्यवस्थित नसेल आणि आपण जर आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागेल असे समजावून सांगितले.
याप्रसंगी आशा सेविका वैशाली आरसूळे,मयुरी आरसुळे ज्येष्ठ शिक्षक श्री मोरे सर श्रीम. पवार मॅडम, श्रीम. पाटील मॅडम सर्व उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सी.एस.शिनगारे यांनी केले तर आभार श्रीमती पवार मॅडम यांनी मानले.

