
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४२७ वा दिवस

सीता हे अद्वितीय पात्र आहे; कदाचित राम अनेक होऊन गेले असतील, पण सीता कधीही एकापेक्षा जास्त नव्हती! ती खऱ्या भारतीय स्त्रीचा आदर्श आहे, कारण एका परिपूर्ण स्त्री चे सर्व भारतीय आदर्श सीतेच्या त्या एका जीवनातूनच विकसित झाले आहेत; आणि आज हजारो वर्षांपासून ती आर्यावर्त देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक स्त्री, पुरुष आणि मुलांकडून पूजनीय ठरत आहे. ती सदैव तेजस्वी राहिल. सीता, पवित्रतेपेक्षाही अधिक पवित्र, सर्व सहनशीलता आणि सर्व दुःखाची मूर्ती आहे. जिने ते दुःखमय जीवन जराही कुरकुर न करता सोसले, ती सदैव लोकांचा आदर्श, देवांचा आदर्श, ती महान सीता, आपली राष्ट्रदेवता राहील. आणि आपल्यापैकी प्रत्येकजण तिला इतके चांगले ओळखतो की तिच्याबद्दल अधिक वर्णनाची गरज नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास २६ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२६
★ १८६१ संस्कृत व इंग्रजी भाषेचे जाणकार, लेखक, कायदेपंडित, न्यायाधीश, भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांचा जन्मदिन.
★ १८७१ ब्रिटिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता, तत्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज यांचा स्मृतीदिन
★ १९०९ स्वातंत्र्यसैनिक, राजकीय हक्कासाठी इंग्लंडमधिल जनतेत जाऊन प्रचार करणारे देशभक्त काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा स्मृतीदिन.
★ १९३१ सुप्रसिध्द अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थाॅमस अल्वा एडिसन यांचा स्मृतिदिन.

