
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३४ वा दिवस

आपली पवित्र परंपरा व आपला प्राचीन धर्म या एकाच समान भूमिकेवर आपल्याला देशाची उभारणी करावयाची आहे. युरोपात राजकीय विचारसरणी ही राष्ट्रीय ऐक्याचा आधार आहे तर आशिया खंडात धार्मिक विचारसरणी. म्हणून भारताचा भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी धर्मातील ऐक्याची नितांत आवश्यकता आहे. या देशाच्या सर्व भागात, प्रदेशात एकाच समान धर्माला मान्यता असली पाहिजे. एकच धर्म या शब्दाने मला काय अभिप्रेत आहे? ख्रिस्ती, मुस्लिम व बौद्ध यांचा जसा एकच धर्म आहे त्या अर्थाने मी एक धर्म म्हणत नाही. आपल्याला ठाऊक आहे की आपल्या सर्व संप्रदायांचे सिद्धांत कितीही भिन्न असले व त्याच्या घोषणा कितीही वेगवेगळ्या असल्या तरी त्या सर्व संप्रदायांना समान अशी आपल्या धर्माची काही तत्वे आहेत, ही समान तत्वे मान्य केल्यानंतर आपल्याला असे दिसते की, आपल्या धर्मात विविधतेला भरपूर वाव आहे. त्यामुळेच आपला धर्म अपार विचारस्वातंत्र्य व जीवनपद्धतींचे स्वातंत्र्य देतो. निदान आपल्यापैकी जे विचारवंत आहेत त्यांना हे ठाऊक आहे; आणि ही जीवनदायी अशा आपल्या धर्माची सर्वसामान्य तत्वे सर्वांपुढे मांडणे आज आवश्यक आहे. आपल्या देशातील सर्व आबालवृद्ध, स्त्री-पुरुषांनी ही तत्वे समजून घेऊन आपल्या आचरणात उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. हेच आपले प्रथम कार्य असले पाहिजे आणि आपण तेच प्राणपणाने केले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर आषाढ २५ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल ३/४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. १७ जुलै २०२६
★ १७९० स्काॅटिश तत्ववेत्ता, अर्थशास्त्राचे जनक अॅडॅम स्मित यांचा स्मृतीदिन.
★ १९३० नाशिक येथील सुप्रसिध्द कवी, दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्मदिन.
★ २०१२ समाजवादी नेत्या, लोकसभेच्या सदस्या खासदार मृणाल गोरे यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

