
पळाशी (प्रतिनिधी) आज 18/07/2026 शनिवार रोजी न्यू इंग्लिश स्कूल पळाशी विद्यालयात इकोक्लब ची स्थापना करण्यात आली त्यानिमित्ताने पर्यावरण संवर्धन काळाची गरज या संदर्भात प्राचार्य अरुण पवार सर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.पर्यावरण बचाव विषयी शपथ घेण्यात आली.तसेच आनंददायी शनिवार निमित्ताने विद्यालयात चित्रकला, रंगरंगोटी स्पर्धा घेण्यात आली.त्यासाठी कला शिक्षक कैलास राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी प्राचार्य अरुण पवार सर,,शैलेश पवार सर,गोकुळ शिंदे सर,विशाल देवरे सर,विजय आव्हाड सर,कैलास राठोड सर, संदिप वाघापुरे सर, अमोल देवरे सर, संदिप वाघ सर, घुगे भाऊसाहेब, अशोक शेवाळे, मनोज शेवाळे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


