
पुणे प्रतिनिधी :
रेडिओ एफटीआयआय ९०.४ या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर गंधाळली माती या पावसाच्या कवितांचे मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या बहारदार काव्य मैफिलीत महाराष्ट्रातील नावाजलेले कवी कवयित्रींनी आपल्या दर्जेदार अशा पावसावरील कविता सादर करून श्रोत्यांना व रसिकांसाठी आनंदाची पर्वणी दिली.
पावसाची सर ,पावसाची विविध रूपे , पावसावरचं वर्णन साहित्यिकांनी या काव्यमैफलीमध्ये अगदी जीव ओतून केलं होतं.
या कार्यक्रमात पर्यावरण मित्र, ज्येष्ठ कवी अशोक भगवंत वाघमारे, ज्येष्ठ कवी डॉ. जयद्रथ आखाडे , कवयित्री सरिता कलढोणे , कवी संतोष कदम, कवी विलास कुंभार, कवी प्रशांत वाघ, कवयित्री रागिणी जोशी या सर्वांनी खुपचं छान कवितांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवयित्री व गझलकारा नयन गोवंडे – काळे यांनी उत्तम प्रकारे निवेदनातून केले व बहारदार कविताही सादर करून रसिकांची मने जिंकली.
शेवटी उपस्थित सर्व मान्यवर साहित्यिकांचे तसेच रेडिओ एफटीआयआय ९०.४ वाहिनीचे प्रभारी मा. विश्वास नेर्लेकर सर , स्टेशन मॅनेजर अनुराधा वजीरे मॅडम व आर जे नीताताई तुपारे मॅडम सह संपूर्ण टीमचे आभार प्रदर्शित करून कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
सर्व साहित्यिक मंडळींनी रेडिओ एफटीआयआय च्या सर्वच सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. लवकरच सदर कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येणार आहे.

