
नांदगाव, (प्रतिनिधी ): महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची नांदगाव तालुका शाखेची सहविचार सभा न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेत नांदगाव तालुक्यातील नवनियुक्त केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या नांदगाव शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमास नाशिक पतसंस्थेचे चेअरमन श्री. महारू निकम, कळवण येथील संघटनेचे पदाधिकारी श्री. जाधव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष श्री. सुभाष सरोदे, तालुका नेते श्री. संजय शेवाळे, जिल्हा नेते श्री. राजेंद्र कदम, सरचिटणीस श्री. अनिल बोरसे, श्री. परसराम शेळके, श्री. भाऊसाहेब मवाळ, श्री. अनिल धोंडगे, केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र काटकर, पदवीधर शिक्षक श्री. हरिश्चंद्र जगधने, श्री. साईनाथ महाडिक, श्री. भगवान सानप, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. शैलेश टिळेकर व श्री. प्रवीण ठाकरे यांच्यासह तालुक्यातील सर्व नवनियुक्त केंद्रप्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बाबुलाल ठोंबरे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. विजय तुरकुणे यांनी केले.
सभेपूर्वी नाशिक पतसंस्थेचा वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल नांदगावचे आमदार श्री. सुहास (अण्णा) कांदे यांना सादर करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली.
यावेळी नांदगाव शाखेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार जळगाव बुद्रुक येथील मुख्याध्यापक श्री. प्रकाश मोरे यांची तालुकाध्यक्षपदी, श्री. पंकज सोनवणे यांची सरचिटणीसपदी आणि श्री. किशोर जवंजाळ यांची कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
याशिवाय नाशिक पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सर्व सभासदांना विशेष भेटवस्तू म्हणून Milton कंपनीच्या पाण्याच्या बाटलीचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी नांदगाव शाखेचे मावळते अध्यक्ष श्री. बाबुलाल ठोंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहारानंतर सहविचार सभेची सांगता झाली.

