
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार
नाशिक ( प्रतिनिधी)नाशिक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांची राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार–२०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. मुनशेट्टीवार हे विशेषतः दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून, समाजहितासाठी त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो.
पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा, राजकारण, वैद्यकीय, विधी, महिला सक्षमीकरण, सहकार, पतसंस्था, कला आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन निवड समितीकडून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येते.
वयाच्या ८०व्या वर्षीही डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांचा या वर्षीच्या पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. हा पुरस्कार रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी झोगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

