
वासोळ-( प्रतिनिधी): येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात २२ जुलै २०२६ रोजी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इंदिरा माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.मा.मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक समिती प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सुरुवातीला विद्यालयातील मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस.यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माहीती सांगत शालेय समिती अध्यक्ष व सदस्य गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शालेय समिती सदस्य श्री.गोरख भामरे,श्री.भारत आहिरे श्री.बबलु पवार श्री.गुणवंत भामरे श्री.कैलास मोरे यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी
उपशिक्षक श्री.निकम एस.के.श्रीम.गुजर एस.एन.श्री.सावंत व्ही.बी.श्री.आहेर एस.सी.श्री.पवार आर.एस.श्री.ठाकरे एस.डी.श्री.चौधरी आर.एस.श्रीम.मोरे जे.आर.आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंदानी सहकार्य केले……
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यालयातिल सर्व सेवकांचे सहकार्य लाभले……
झाडे लावा,झाडे जगवा🌳🌴🌳🌴

