
वासोळ:- इंदिरा माध्यमिक विद्यालयात स्व.अजितदादा पवार यांची जयंती साजरी करतांना
वासोळ-:( प्रतिनिधी )येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात २२ जुलै २०२६ रोजी स्व.अजितदादा पवार साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक समिती प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले.सुरुवातीला विद्यालयातील मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस.यांच्या अध्यक्षतेखाली स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.सदर कार्यक्रमास शालेय समितीचे सदस्य श्री.गोरख भामरे,श्री.भारत आहिरे,श्री.गुणवंत भामरे,श्री.बबलु पवार उपस्थित होते. श्री.आहेर एस.सी.यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. श्री.सावंत सर यांनी स्व.अजितदादा पवार यांच्या जीवन कार्याविषयी माहीती सांगितली. व कार्यक्रमाचा समारोप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस.यांनी केला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी
उपशिक्षक श्री.निकम एस.के.श्रीम.गुजर एस.एन.श्री.सावंत व्ही.बी.श्री.आहेर एस.सी.श्री.पवार आर.एस.श्री.ठाकरे एस.डी.श्री.चौधरी आर.एस.श्रीम.मोरे जे.आर. आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंदानी सहकार्य केले……

