
सायखेडा वार्ताहर- आज जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयात गुरुशिष्य पुण्यतिथी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांची जयंती व मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री यु.के. पवार सर मविप्रचे सभासद श्री सुधीर शिंदे, श्री रामा कुटे श्री .सुधाकर भालेराव, पर्यवेक्षक श्री.पगार एस .एन सर, व इतर मान्यवरांच्या हस्ते स्व अजितदादा पवार, कर्मवीर काकासाहेब वाघ तसेच माधवराव बोरस्ते यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. यावेळी इ 8वी ड च्या विद्यार्थीनी कु नैना शिंदे, कु दुर्वा बिरार कु जयश्री जाधव या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगत श्री आवारे सर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पवार सर यांनी गुरुशिष्य पुण्यतिथी व स्व अजितदादा पवार यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय धनवटे यांनी केले. श्री एस. एस. शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले. श्री महाले सर व श्रीमती कापडी मॅडम यांनी सुंदर फलकलेखन केले. कार्यक्रमानंतर मा मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

