
पांझणदेव (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत माध्यमिक विद्यालय पांझणदेव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. समृद्धी बँक, नांदगावच्या अध्यक्षा मा. अंजुमताई कांदे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सरचिटणीस अशोक बाबा डघळे, अध्यक्ष उत्तम गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मा. दिलीपजी नाईकवाडे, मुख्याध्यापिका वर्षा पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बच्छाव यांनी केले, तर आभारप्रदर्शन अनिल गोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहन कदम, सचिन अहिरे, रविंद्र गायकवाड आणि बापू पगारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि भावी पिढीमध्ये निसर्गप्रेमाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

