
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४० वा दिवस

भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे रहस्य संघटना, शक्तिसंचय व इच्छाशक्तीचे परस्पर सहकार्य यांतच साठलेले आहे. याचवेळी ऋग्वेदातील पुढील अपूर्व मंत्र माझ्या मनात येत आहे.
संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम् ।
देवा भागं यथा पूर्वे सञ्जानाना उपासते ।।(१०-१९१-२)
हा मंत्र आपल्याला सांगतो, ‘तुम्ही सर्वजण मनाने एक व्हा, तुमचे विचार एक असोत, कारण विचाराने एक असल्यामुळेच पूर्वी देव यज्ञातील हविर्भाग घेऊ शकत असत. मनुष्याकडून उपासना ग्रहण करण्यास देव योग्य होते, कारण ते एका विचाराचे होते’. मनाने एक होणे यात समाजाच्या स्थैर्याचे रहस्य आहे. आणि जर तुम्ही आर्य-द्रविड, ब्राह्मण-अब्राह्मण यांसारख्या क्षुल्लक प्रश्नांवरून कलह माजवीत बसाल, तर भारताचे भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तिसंचयास तुम्ही मुकाल. कारण, लक्षात ठेवा की, भारताचे भविष्य सर्वस्वी ह्या गोष्टीवरच अवलंबून आहे. इच्छाशक्तींचे संमीलन, त्यांचे परस्पर सहकार्य व त्यांचे केंद्रीकरण हेच रहस्य होय.
स्वामी विवेकानंद…
वाढदिवस

दिविज विक्रम घुगे
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. २३ जुलै २०२६
★ १८५६ भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी नेते, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, समाजसुधारक, पत्रकार भगवद् गीतेचे भाष्यकार (गीतारहस्य) लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक यांचा जन्मदिन.
★ १९०६ क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिन.
★ आंतरराष्ट्रीय विधवा दिन.
★ संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

