
साकोरे ( प्रतिनिधी ) आज गुरुवार दिनांक 23/7/26 रोजी सकाळी 9:00 वाजता पालक – शिक्षक मेळाव्या च्या अध्यक्ष स्थानी स्कुल कमेटी व्हा चेरमन भारत शिवाजी बोरसे होते तसेच शालेय व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पिरनाई संस्थेचे पदाधिकारी दिनेश पाटील, प्रकाश सोनेज, विलास बोरसे, राजेंद्र बोरसे हे उपस्थिती होते. पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी केले. पालक वर्गाने विद्यार्थी सबंधीत शैक्षणिक व इतर अङचनी बाबत चर्चा शिक्षकांन सोबत मनमोकळे पणाने केली यावर उपाययोजना करुन सोङवण्या बाबत शिक्षकांनी हमी दिली. सुरसे सर व पूनम बोरसे यांनी नवोदय व स्काँलरशिप साठी जास्तीत जास्त विद्यार्थी बसविण्याचा आग्रह धरला. पालक वर्गाने विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक गुणवत्ता बाबत समाधान व्यक्त केले. आपले मुल समजून शिक्षक काळजी घेतात तसेच बाहेर पण मुलान वर लक्ष ठेवतात हे अलिकङे दिसून येत आहे याबाबतीत खर कौतुकास्पद आहे असे समाधान बोरसे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष दिनेश पाटील सर सेवानिवृत्त झाले त्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच संचालक प्रकाश सोनेज यांची छञपती शिवाजी विद्यालय परधाङी येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती बद्दल सत्कार करण्यात आला. विलास बोरसे सर यांना लोकमत नांदगाव गौरव सन्मान मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. राजेंद्र बोरसे सचिव नांदगाव येथे फोरमन म्हणून बढती मिळाल्याबद्दल या सर्वांचा सत्कार विद्यालय कङून करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञसंचलन किशोर क्षीरसागर सर व आभार राजेंद्र भाबङ यांनी केले.

