
नाशिक- (बातमीदार) नाशिक कवी या संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते .दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेल्या आहेत. रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता भावबंधन मंगल कार्यालय, हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक ४२२००३ या ठिकाणी या स्पर्धा होणार असून दुपारी दोन वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांकासाठी रु.५००/-, द्वितीय क्रमांकासाठी रु.३००/-, तृतीय क्रमांकासाठी रु.२००/- आणि उत्तेजनार्थ म्हणून रु.१००/- असे रोख पारितोषिक तसेच विजेत्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी छोटा गट आणि इयत्ता आठवी ते दहावी (मोठा गट) अशा दोन गटामध्ये होणार आहे. स्पर्धेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आपली स्वरचित कविता सादर करावयाची आहे. इतर कवींची कविता सादर केल्यास त्या स्पर्धकाला बाद केले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला कविता सादर करण्यासाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात येईल.प्रत्येक कविता फक्त मराठी भाषेत असावी.स्पर्धकांनी स्पर्धेसाठी येताना आपला जेवणाचा डबा सोबत घेऊन यावा कारण स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण होणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 9881074441 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. नाशिक जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष इंजि.बाळासाहेब मगर, उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, कार्याध्यक्ष सुभाष सबनीस, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे, किरण मेटकर, राजेश जाधव, अजय बिरारी, स्मिता बनकर, अलका कुलकर्णी, भारती देव, प्रांजली आफळे, सुरेश चौरे यांनी केले आहे.

