
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४१ वा दिवस

बुद्धीसंपन्न आणि लोकसेवेसाठी सर्वस्व समर्पण करणारे युवक हवेत. माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राणही ओवाळून टाकण्याची सिद्धता असलेल्या आणि त्याद्वारे स्वतःचे आणि संपूर्ण देशाचे कल्याण करू शकणाऱ्या अज्ञांकित युवकांवरच माझ्या भविष्यातील आशा केंद्रित झाल्या आहेत. सर्वसामान्य मुले माझ्याकडे येतच असतात. त्यांच्या मुद्रेवर तेज नसते, त्यांच्या हृदयात उत्साहाचा अभाव असतो, त्यांची शरीरे दुबळी कुचकामी असतात आणि मनात धैर्याचा लेशही नसतो, अशांकडून काय काम होणार? नचिकेताची श्रद्धा असलेले १०० युवक मला मिळाले तर या देशातील विचारांना आणि कार्याला मी नवी दिशा देऊ शकेल. मी जग बदलून दाखवेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण २ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. २४ जुलै २०२६
★ १९११ हैदराबाद मुक्ती संग्रामातील झुंजार स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्राॅफ यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

