
जळगाव निंबायती (वार्ताहर) – अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालय तथा स्वर्गीय रोडूआण्णा गोविंदराव पाटील कला वाणिज्य, विज्ञान वरीष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विषयाचे अध्यापक प्रा. पी. यु. शिंदे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत मुख्याध्यापक व्ही. डी. काळे, पर्यवेक्षक डी. के. जगताप, वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सद्दाम अन्सारी प्रा. एस. टी. जाधव, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. अमोल अहिरे यांनी केले तर आभार एम. के पोलगीर यांनी मानलेत.

