
नामपुर (प्रतिनिधी) महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामपूर येथे दिनांक 22 जुलै 2026 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु बी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते कनिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक श्री आर एस बागुल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या सखोल पुनर्परीक्षण कार्यक्रमाविषयी सखोल माहिती दिली तसेच(SIR) ही मतदार याद्यांमधल्या त्रुटी दूर करून ती निर्दोष करण्याची प्रक्रिया आहे

याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) मतदार यादी दुरुस्ती करण्याचे कामाविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली तसेच मतदारांना शक्य झाल्यास वोटर, इसी, गव्हर्मेंट,इन वर मागील SIR आपल्या किंवा आई-वडील किंवा आजी-आजोबा तपशील नाव, मतदार संघ, यादी भाग, क्रमांक अनुक्रमांक यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच अध्यक्षनीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु बी कदम यांनी मतदार यादी विषयी जनजागृती मोहीम तसेच नागरिकांसाठी आधारकार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला , शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र, याविषयी सखोल मार्गदर्शन केले
या कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए एस सावळे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम.व्ही.दासनूर सर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ए एस जोशी व आभार प्रदर्शन एस आर निकम यांनी केले.

