
पळाशी (प्रतिनिधी ) आज 24 जुलै रोजी आमच्या विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने पालखी व दिंडी काढण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोकुळ शिंदे सर यांनी केले.शालेय प्रांगणात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच विठ्ठल रुक्मिणी यांच्या अभंगातून संपूर्ण परिसर भक्तिमय व पांडुरंगाच्या नामात तल्लीन झाला.गावात पालखीचे पूजन करण्यात आले या प्रसंगी गावातील ह.भ.प.भजनी मंडळ पळाशी विशेष सहकार्य केले. आजच्या कार्यक्रमाची सर्व तयारी शाळेचे प्राचार्य श्री.अरुण पवार, तसेच सांस्कृतिक प्रमुख श्री. गोकुळ शिंदे, व श्री.संदीप वाघापुरे तसेच श्री.विशाल देवरे,श्री.कैलास राठोड, श्री.विजय आव्हाड , श्री.अमोल देवरे श्री.शैलेश पवार,श्री. प्रभाकर घुगे,श्री. मनोज शेवाळे,श्री.अशोक शेवाळे यांनी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. विठ्ठल व रुक्मिणी रूपात कोमल सानप, सिध्दी सांगळे, पायल पवार, सानिका शेवाळे, श्रावणी सानप, कल्याणी पवार या विद्यार्थ्यांनी होत्या. संपूर्ण गावातून वारी ची मिरवणूक काढण्यात आली.तसेच रिंगण, फुगडी हे सर्व कार्यक्रम आनंदात पार पडले. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी व पळाशी गावाने खूप सहकार्य केले.

