
गावदरी( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा (वेहेळगाव)येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा रंगला त्यात मुख्य आकर्षण म्हणजे S I R कामाचे महत्व समजवून देण्यात आले. ह्या शाळेचे महत्व हेच आहे कि नवनवीन उपक्रम राबवणे आणि चालू घडामोडी पाहून त्यावर काहीतरी नवीन उपक्रम करणे.
ह्यावेळी जो जिवंत प्रश्न चालू आहे तो म्हणजे आपल्या घरातील मतदान यादीतील नाव तपासणे व योग्य ते पुरावे देऊन आपले मतदान योग्य ठिकाणी नोंद करणे हेच काम ह्या दिंडीचे आकर्षण ठरले. ह्या शाळेतील विद्यार्थी म्हणजेच विठू माऊली, रुख्मिणी आणि आपले वारकरी भक्त आपल्या शिक्षकांसोबत एस. आर. आय. कामाचे महत्व समजावून देत होते.

ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या वस्तीवर कोणतेही दुकान नाही उपयोगी मिळेल असे साहित्य नाही तरी याशाळेतील उपक्रम खुप छान असतात. आत्ता पर्यंत श्री विलास सोनवणे ह्या शाळेची प्रगतीसाठी प्रयत्न करत होते आत्ता त्याना श्री थोरे सरांची साथ मिळाली आहे. तेव्हा पासून शाळेत विद्यार्थी गुणवत्ता व पटसंख्या वाढण्यास मदत होत आहे.
आज झालेल्या चिमुकल्यांच्या दिंडीला गावकरी यांची ही साथ मिळाली. विठ्ठल व रुख्मिणी यांची पालखीची मिरवणूक सर्व वस्तीवर काढण्यात आली.त्यावेळी गावातील महिलांनी पूजा केली. गावाकऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले व शिक्षकांचे आणि विद्यार्थी यांचे कौतुक केले. ह्यावेळी ह्या शाळेचे शिक्षक श्री विलास सोनवणे यांना विनोबा पोस्ट ऑफ मंथ चा नाशिक जिल्ह्याचा विनोबा अवार्ड मा.श्री ओंकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांच्या हस्ते मिळाला होता.म्हणून गावकरी व सहकारी शिक्षक यांनी त्यांचा सत्कार केला. ह्या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य तसेच गावातील महिला आणि ग्रामस्थ उपस्थिती होते.

