
महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांवर सातत्याने अन्याय होत असून बीपीएड झालेल्या युवकांना भरतीची प्रतीक्षा आहे . प्राथमिक शाळांच्या केंद्रस्तरावर 4868 शारीरिक शिक्षकांच्या जागांची निर्मिती करण्यात आली मात्र दोन वर्षापासून भरती प्रक्रिया सुरू होत नाही. महानगरपालिका क्षेत्रामध्ये क्रीडा शिक्षकांच्या जागा भरण्यात आलेले नाही महानगरपालिकेने यावर त्वरित कारवाई करावी प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक भरती करावी व शारीरिक शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी नाशिक जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केली.

सदरील मागण्या मान्य न झाल्यास या वर्षी क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार घालण्यात येईल. असा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित नाशिक यांनी शारीरिक शिक्षण शिक्षकांची सहविचार सभा आयोजित केली होती यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील तालुका क्रीडाअधिकारी उपस्थित होते ,
संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, राजेंद्र सोमवंशी हेमंत पाटील मधुकर वाघ अमोल जोशी दिनेश अहिरे किशोर राजगुरू व इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

सदर निवेदनामध्ये ….
१) जिल्हा परिषद केंद्रस्तरीय 4860 क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली तात्काळ जाहीर करून भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी.
२) १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार त्याला शिक्षकांच्या पदावर इतर विषयांचे शिक्षक समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टल द्वारे भरण्यात यावी .
३) शासन निर्णय २ जानेवारी २०२६ नुसार मंजूर ४८६० सर्व पदे १००% पवित्र पोर्टल ताईत २०२५ भरतीच्या पहिल्या टप्प्यात भरण्यात यावी
४) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची भरती करण्यात यावी.

