
पोखरी, ता. नांदगाव (जि. नाशिक) – ज्ञान विकास मंडळ संचलित माऊली माध्यमिक विद्यालय, पोखरी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
V.J.हायस्कूलच्या इ. स. १९८१-८२ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी, सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयातील २१ गरजू विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस, शालेय बॅग, बूट (शूज) तसेच सर्व विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र नंद सर होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, शिक्षणामुळेच जीवनात प्रगती साधता आली असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
श्री. राजेंद्र नंद सर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून, “विद्यार्थी मोठे झाल्यानंतर आपल्या शाळेशी नाळ जपतात आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करतात, हीच शिक्षकांसाठी खरी अभिमानाची बाब आहे,” असे प्रतिपादन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अधिक उत्साहाने करण्यासाठी त्यांना मोठा आधार मिळाला आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री नंद सर यांच्या दहावीच्या बॅचचे मित्र मुन्ना तोरणे,प्रकाश थोरात, कैलास मोकळ,पांडुरंग राऊत,पवन रायभातर,संजय अमृतकर, निलेश कासलीवाल,उपस्थित होते. तसेच ज्ञान विकास मंडळाचे अध्यक्ष बी.आर. सुरसे. सर,सचिव निकम सर, संचालक दादासाहेब बोरसे, सर संचालक राजेंद्र सुरशे, सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक रमेश घोडके सर, विजय कदम सर,राजेंद्र शेवाळे सर,ज्योती निकम मॅडम, शशिकला कदम मॅडम, बबीता तोरणे मॅडम, हिंदवी तोरणे मॅडम, लिपिक सम्राट पगार सर, सेवक ऋषिकेश सुरसे,उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री सुरेश सर (संस्थेचे अध्यक्ष) सचिव निकम सर,यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक घोडके सर यांचे भाषण झाले. आणि अध्यक्षीय भाषण राजेंद्र नंद सर, यांनी केले. आभार बबीता तोरणे मॅडम, यांनी माणले.आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम सर यांनी केले.

