
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५० वा दिवस

जे काही दयाशील आहे, जे काही कल्याणमय आहे, जे काही शुभंकर आहे, जे काही सहाय्यकारक आहे त्या साऱ्यांची अमूर्त समष्टी म्हणजेच ईश्वर. ईश्वरासंबंधी आपली हीच एकमेव कल्पना असावयास हवी. आपण जेव्हा स्वतःला आत्मस्वरूप समजतो तेव्हा आपल्याला कोणताही देह नसतो, म्हणून मी ब्रह्म आहे मला कोणी काहीही करु शकत नाही असे म्हणणे वेडेपणाचे आहे. देहाकडून कोणतेही वाईट कर्म घडणे शक्य नाही, कारण जोपर्यंत आपल्या मधील समस्त वाईट प्रवृत्ती जळून खाक होत नाही तोपर्यंत मुळी मुक्ती लाभणेच शक्य नाही. ज्यावेळी आपल्याला मुक्ती लाभते त्यावेळी आपल्यातील सगळी हीण जळून गेलेले असते आणि शिल्लक उरलेली असते 'ज्योतिरिव अधूमकम्' तीच धूमरहित ज्योती, त्यावेळी आपली अवस्था 'दग्धेन्धनमिवानलम्' इंधन संपून गेलेल्या अग्नीसारखी.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण ११ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. २ ऑगस्ट २०२६
★ संकष्ट चतुर्थी
★ १७८१ पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यापैकी एक पूर्ण शहाणा सखारामबापू बोकील यांचा स्मृतिदिन.
★ १८७६ भारताचा राष्ट्रध्वज “तिरंगा” ध्वजाचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

