
निफाड तालुक्याचे भूमिपुत्र नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी यांच्या ” वासुदेव गीत ” व ” शाळेला छान छान बनवायचं…” दोन कवितांचा समावेश महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता चौथी च्या कलाशिक्षण पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील लोकपरंपरा जपणारी माणसं तसेच बरीच जुनी परंपरा व त्यांची वैशिष्ट्ये वासुदेव गीत या कवितेत मांडली आहेत..
तर ….

शाळेला छान छान बनवायचं या कवितेतून स्वच्छतेचा संदेश व पाण्याची बचत करण्याची सवय महत्वाची गोष्ट आहे तेच संस्कार जपणा-या मूल्य शिक्षणाचा धडाही मिळतो आहे…
२०२६-२७ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या या कविता अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य करणार आहे….
बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी यांचे
” गम्माडी गम्मत ” व
” गीत नवे गाऊ ” हे दोन बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाले असून गीत नवे गाऊ हा बालकाव्यसंग्रह चपराक प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.

या संग्रहास तीन जिल्हा व तीन राज्य पुरस्कार मिळाले असून राजेंद्र सोमवंशी यांनी दिल्ली येथे संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी उत्तर महाराष्ट्रातीचे प्रतिनिधित्व केले आहे.
बालभारती च्या पाठ्यपुस्तकात कविता समाविष्ट झाल्याबद्दल आमदार मा.दिलीपकाका बनकर, माजी आमदार अनिल आण्णा कदम ,सावानाचे अध्यक्ष मा.प्रा.दिलीप फडके सर ,एन.ई.आय.चे अध्यक्ष मा.प्रकाश वैशंपायन , म्हाडाचे विभागीय अध्यक्ष मा.रंजनभाऊ ठाकरे , दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.दत्तात्रय दादा पाटील,भाजपा नेते मा.बंडुकाका बच्छाव ,माजी जि.प.सदस्य मा.अमृताताई पवार, उपनगराध्यक्ष अनिल पा.कुंदे , अर्बन बँकेचे मा.चेअरमन नंदलालजी चोरडिया, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.राजेंद्र डोखळे,मा.प्रकाश दायमा,माजी संचालक मा.शिवाजीराव ढेपले, शिक्षक नेते मा.संजय चव्हाण, वकील संघाचे अध्यक्ष अँड.प्रवीण ठाकरे, चपराक प्रकाशनाचे मा.घनश्याम पाटील,अँड.इंद्रभान रायते, साहित्य परिषद शाखा नाशिकरोडचे अध्यक्ष मा.उन्मेष गायधनी , शिक्षक नेते मा.रविंद्र मोरे,मा.शिवाजीराव निरगुडे,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ.सुरेश सावंत, बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड , लोककवी
प्रा.प्रशांत मोरे, सुप्रसिद्ध साहित्यिक विवेक उगलमुगले , कवी-सुत्रसंचालक रवींद्र मालुंजकर, गिरणा गौरव चे अध्यक्ष मा.सुरेश पवार, सावानाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर , माणुसकी फाऊंडेशन चे मा.सागर निकाळे,युवा कवी प्रशांत केंदळे , बालसाहित्यिक मा.किरण भावसार, कवी राजेंद्र उगले, कवी राज शेळके,
कवी संदीप देशपांडे,प्रा.जावेद शेख,कवी राजेंद्र दिघे यांनी अभिनंदन केले आहे.

